आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षित:शहाद्यात 29 पैकी 15 जागा महिला आरक्षित; एक जागा अनुसूचित जाती, दोन जागा अनुसूचित जमाती

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहादा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात सोमवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. २९ सदस्यांपैकी १५ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या असून त्यात एक जागा अनुसूचित जाती, दोन जागा अनुसूचित जमाती व १२ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

ओबीसी आरक्षणाशिवाय हे आरक्षण काढण्यात आले आहे. तसेच यात काही प्रस्थापितांच्या प्रभागात नगरपालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी लोकमान्य टिळक हॉल येथे प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासन डॉ. चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. पालिकेच्या १४ प्रभागातून २९ सदस्य निवडले जाणार आहेत. या २९ सदस्यांपैकी १५ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार असून उर्वरित १४ जागा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असणार आहेत. बैठकीला मुख्याधिकारी दिनेश सिनारे कार्यालयीन पर्यवेक्षक सचिन महाडिक अभियंता आशिष महाजन स्वच्छता निरीक्षक आर एम चव्हाण, माजी नगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर, अभिजित पाटील, अरविंद कुवर, भाजपचे आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, प्रशांत निकम, लक्ष्मण बडे, वसीम तेली, आरिफ मासूम पिंजारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, एकनाथ नाईक, भुऱ्या पवार, संतोष वाल्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत पाटील, दिनेश नेरपगार, अतुल शास्त्रीसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...