आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तगट तपासणी‎:शिबिरात 158 रुग्णांचे निदान; तर‎ 120 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी‎

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎सावता फुले फाउंडेशनतर्फे‎ झालेल्या शिबिरात १५८ रुग्णांची‎ मोफत तपासणी करुन मोफत‎ औषध वाटप करण्यात आले.‎ तसेच १२० विद्यार्थ्यांची रक्तगट ‎ ‎ तपासणी करण्यात आली.‎ माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी ‎ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन‎ झाले. प्रमुख पाहुणे म्हणून‎ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष‎ डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक‎ काँग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे,‎ राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कमलेश‎ चौधरी, नगरसेवक जगन्नाथ‎ माळी, माजी नगरसेवक मोहन‎ माळी, माजी नगरसेवक निंबा‎ माळी, विजय माळी, पांडुरंग‎ माळी, गुलाब माळी, माजी‎ नगरसेवक राकेश खलाणे आदी हे‎ उपस्थित होते.

विद्या सरोज‎ हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल महाजन‎ त्यांच्या सहकार्याने १५८ रुग्ण‎ मोफत तपासून त्यांना मोफत‎ औषध वाटप करण्यात आले.‎ काही रुग्णांना जागेवरच ईसीजी,‎ कोलेस्ट्रॉल, शुगर, बीपी आदी‎ तपासण्या मोफत करण्यात आल्या.‎ तसेच एचएम मेमोरियल लॅबचे‎ संचालक कैलास मराठे यांच्यातर्फे‎ १२० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी‎ करण्यात आली. मनोज गायकवाड‎ यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा‎ सचिव यादव माळी यांनी‎ सूत्रसंचालन केले. आभार सुरेश‎ माळी यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...