आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृष्णा शांती:20 रुपयांत 20 लिटर मिळते जारचे पाणी, शहरात 22 पेक्षा अधिक जार विक्रेते; दररोज 40 ते 70 हजारांची उलाढाल नंदुरबार शहरात दोन हजार जारद्वारे 25

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची लोकसंख्या वाढली आहे. अशातच शहराचा तापमानाचा पारा यंदा ४५ अंशांच्या पुढे गेला.पालिकेच्या वतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. होळतर्फे हवेली, कोकणी हिल, पातोंडा या परिसरात पाण्याची नेहमीच तीव्र टंचाई भासत असते, अशातच आता पाण्याचे जार लोकांसाठी पर्याय ठरले आहेत.

नंदुरबार शहरात दोन हजार जारद्वारे सुमारे २५ हजार लिटरचा आसपास थंड पाण्याची विक्री होत आहे. दुकानदार, सरकारी कार्यालयातील नोकरदार वर्ग जारला पसंती देत आहेत. पिण्याच्या जार विक्रीतून दररोज ४० हजार ते ७० हजाराची उलाढाल होत आहे.शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी काही भाग पालिका हद्दीत येत नसल्याने या भागात जारने पाण्याची तहान भागवली जात आहे. शहरातील अनेक आस्थापने, दुकान मालक जारला पसंती देतात.

बातम्या आणखी आहेत...