आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घूमर महोत्सवाचे आयोजन:गुरव बायपास मैदानावर 20 ला घूमर महोत्सव; आयोजनात स्थानिक महिला संघटनांचा सहभाग

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुरव चौक बायपास मैदानावर येत्या २० नोव्हेंबर रोजी महिलांच्या नंदुरबार घूमर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये ४ हजारांपेक्षा अधिक महिला सहभागी होऊन घूमर नृत्य सादर करणार आहेत. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व महिला संघटना परिश्रम घेत असल्याची माहिती प्रियंका जगदीश माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.नंदुरबार शहरात अशा पद्धतीने हाेणारा हा पहिलाच कार्यक्रम असून अधिक महिलांनी घूमर नृत्य केले तर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकार्ड’मध्ये त्याची नोंद केली जाणार असल्याचेही माने यांनी सांगितले.

लाेकसंस्कृतीचे दर्शन घडणार
या निमित्ताने आदिवासी लोक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या कार्यक्रमाला मराठी सिनेतारका अलका कुबल, मानसी नाईक, पूजा शर्मा, रेखा यांची उपस्थिती लाभणार आहे.

तर लावणी किंग किरण कोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाला राखी तवर, तेजल चौधरी, शीतल चौधरी, स्थानिक आयोजक कुणाल वीर, सुलभा महिरे, पूनम भावसार, विनिता चौधरी, सुप्रिया कोतवाल, मालती वळवी, शिवानी परदेशी आदींचे सहकार्य लाभत आहे.या महाेत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात येत असून त्याचे संपूर्ण नियाेजन करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सर्वांना या महाेत्सवाविषयी उत्सुकता दिसली.

बातम्या आणखी आहेत...