आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या परीक्षेत २० हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीच्या चार शाखेत २०६ तुकड्यांसाठी १७ हजार ७६५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामुळे २२६० विद्यार्थ्यांना वेगळ्या करिअरचा विचार करावा लागणार आहे. तसेच अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची झुंबड उडणार आहे.
दहावीचा शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर शनिवारी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. सोमवारपासून प्रवेशप्रक्रियेसाठी गर्दी होणार आहे. अनेक विद्यार्थी कुठल्या शाखेत प्रवेश घ्यावा, यासाठी अजूनही संभ्रमित आहेत.
अनुदानित तुकड्यांची स्थिती
कला शाखेसाठी ७८ तुकड्या असून, ६ हजार ७२० विद्यार्थी क्षमता आहे. तर वाणिज्य शाखेसाठी केवळ आठ तुकड्या आहेत तर ७२० विद्यार्थी क्षमता आहे. विज्ञान शाखेसाठी अनुदानित ३२ तुकड्या आहेत. त्यात २ हजार ७२५ विद्यार्थी क्षमता आहे. संयुक्त शाखेच्या ३२ तुकड्या आहेत तर विद्यार्थी क्षमता केवळ ४०० आहे. अनुदानित १२३ तुकड्यांसाठी १० हजार ५६५ विद्यार्थी क्षमता आहे.
२० टक्के अनुदानित
वीस टक्के अनुदानित विज्ञान शाखेच्या २२ तुकड्या असून, १ हजार ८८० विद्यार्थी क्षमता आहे. तसेच ५ तुकड्यांसाठी जवळपास ४४० विद्यार्थी क्षमता आहे. वीस टक्के अनुदानित २७ तुकड्यांसाठी २ हजार ३२० विद्यार्थी क्षमता आहे.
विना अनुदानित शाखा तुकड्या
कला शाखेत ८ तुकड्या आहेत. ७२० विद्यार्थी क्षमता आहे. वाणिज्य १ तुकडी आहे. ८० विद्यार्थी क्षमता आहे. एकूण ३० तुकड्यांसाठी २ हजार ६८० विद्यार्थी क्षमता आहे. स्वयंअर्थसाहाय्यित कलाच्या ६ तुकड्या आहेत. ४८० विद्यार्थी क्षमता, वाणिज्य ५ तुकड्या ४४० विद्यार्थी क्षमता, विज्ञान १५ तुकड्या १२८० विद्यार्थी क्षमता, एकूण २६ तुकड्या २२०० विद्यार्थी क्षमता आहे.
जीटीपीत प्रवेशप्रक्रिया सुरू
शहरातील जीटीपी महाविद्यालयात विज्ञानच्या ३ तुकड्या आहेत. २६० विद्यार्थी क्षमता आहे. प्रत्येक तुकडी १२० यात दोन तुकड्या अनुदानित तर एक तुकडी विनाअनुदानित आहे. वाणिज्य शाखेच्या १ तुकडीत १२० विद्यार्थी क्षमता आहे. कला शाखेच्या २ तुकड्या असून, २४० विद्यार्थी क्षमता आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झालीय.
प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव, जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.