आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन मंडळ बैठक:आदिवासी योजनेचा 277 कोटी 95 लाख निधीत 25 टक्के वाढीसाठी देणार प्रस्ताव

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२३ -२४ या वर्षासाठी आदिवासी योजनेसाठी २७७ कोटी ९५ लाख नियतव्यय असून आकांक्षित जिल्हा असल्याने २५ टक्के निधी वाढवून मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच हाेळी उत्सवाला महोत्सवाचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. होळी उत्सवात सहभागी लोकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

या वेळी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदी उपस्थित होते. डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, बारमाही रस्ते, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायतींच्या इमारती दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी ३ डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीसाठी १२ कोटी, सर्वसाधारण योजनेसाठी ९९ कोटींचे नियोजन केले आहे. २०२४ पर्यंत जलजीवन मिशनचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; परंतु ठेकेदारांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे कामाला गती कमी आहे, असे म्हणाले.

जनसुविधा ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदानासाठी ९०० लाखांची तरतूद
कृषी व संलग्न सेवा या क्षेत्रांतर्गंत ३०० लाख, जनसुविधा ग्रामपंचायतींना सहायक अनुदाने या करिता ९०० लाख, उर्जा, विद्युत विकासासाठी ४५१ लाख, रस्ते विकास करिता ८०० लाख, पर्यटन आणि यात्रास्थळांचा विकास २५० लाख, सार्वजनिक आरोग्य १४९२ लाख, अंगणवाडी बांधकाम १०० लाख, नावीन्य पूर्ण योजनेसाठी ३४९.९६५ लाख, महिला व बालविकास कल्याण २८४.९७ लाखचे नियोजन आहे.

२०२३ ते २४ करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ९९ कोटी ९९ लाख नियतव्यय मर्यादा जिल्ह्याला दिली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेतर्गंत ११३३ लाख मर्यादा असून आदिवासी उपाययोजनेसाठी २७७ कोटी ८५ लाख ४० हजारांची नियतव्यय मर्यादा असून एकूण जिल्ह्याला एकूण ३८९ कोटी ५७ लाख ४० हजारांची मर्यादा घालून दिली.

काठीच्या होळीचे नियोजन
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या ६८ टक्के आहे. आदिवासींचा पारंपरिक होळी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आदिवासींची काठीची होळी ही तर वैशिष्ट्यपूर्णच मानली जाते. होळी उत्सवात दुर्गम पाड्यातून लाखाहून अधिक आदिवासी बांधवांची उपस्थिती असते. मात्र या आदिवासी बांधवांना राहण्याची सुविधा नसते.

अनेक भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसते. शासनाकडून या सर्व सुविधा यंदा मिळणार आहेत.आतापासूनच नियोजन करण्यात येणार असल्याने यंदाचा होळी उत्सव हा राज्यासह देशभरात महोत्सव म्हणूनच पुढे येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...