आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:विनयभंगप्रकरणी 3  वर्षांचा कारावास, 10  हजार दंड‎

नंदुरबार21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनयभंग केल्याप्रकरणी‎ मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद‎ चव्हाण यांनी चंद्रशेखर मुरलीधर‎ भस्मे (वय ४९) यास ३ वर्षे सश्रम‎ कारावास, १० हजार रुपये दंडाची‎ शिक्षा सुनावली.‎ शहरातील एका महिलेचा‎ विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या‎ तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलिस‎ ठाण्यात १० नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा‎ दाखल करण्यात आला होता.

हा‎ गुन्हा महिलांविषयक गंभीर स्वरूपाचा‎ असल्याने गुन्ह्यातील आरोपी‎ चंद्रशेखर भस्मे (वय ४९, रा. नूतन‎ हायस्कूल समोर, नंदुरबार) यास ११‎ नोव्हेंबर रोजी तत्काळ अटक‎ करण्यात आली होती. नंदुरबार शहर‎ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक‎ प्रियदर्शनी थोरात यांनी तपास करीत‎ महत्त्वाचे पुरावे जमा केले होते.‎

बातम्या आणखी आहेत...