आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तणाव निर्माण करणाऱ्या 3 युवकांवर गुन्हा दाखल; अटक करून न्यायालयात उभे

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नूपुर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत असताना शहरातील काही युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाॅट्सअॅपवर नूपुर शर्मा यांचा फोटो स्टेटस म्हणून टाकून चिथावणी देणारे लिखाण केल्यामुळे शहादा पोलिसांनी तीन युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शहादा शहरातील राहुल विजय सोनार, युवराज रघुनाथ पाटील व सागर संतोष खेडकर यांनी व्हाॅट्सअॅपवर नूपुर शर्मा यांचा फोटो स्टेटस म्हणून टाकला. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात सोशल मीडिया कायद्यान्वये शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांना अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा तपास स्वतः पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तणाव निर्माण होईल, असा कोणताही प्रकार करून नये, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...