आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम:विधवा महिलेच्या बँक खात्यात 30 लाख जमा ; पती निधनानंतर विमा संरक्षणांतर्गत मिळाली रक्कम

नंदुरबार20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँक ऑफ इंडिया नंदुरबार शाखेत पगार खाते असलेल्या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झालेल्या विधवा पत्नीच्या बँक खात्यात तब्बल ३० लाख रुपये आल्याने तिला सुखद धक्का बसला. अर्थात पती निधनानंतर सॅलरी पॅकेज याेजनेंतर्गत दिलेली विमा संरक्षणाची ही रक्कम असल्याचे स्पष्ट झाले.

करणसिंग गावित यांचे २ डिसेंबर २०२१ रोजी दोंडाईचा-नंदुरबार मार्गावर अपघातात निधन झाले. करणसिंग हे रेल्वे पोलिस बलात दोंडाईचा येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय बँकेत खाते बंद करण्यासाठी आले असता अधिकाऱ्यांनी हे खाते सॅलरी पॅकेज अंतर्गत असल्याने त्यास विमा संरक्षण असल्याची माहिती दिली. तसेच त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वारसांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीस लाख मात्र विमा संरक्षक रक्कम २७ मे रोजी त्यांच्या पत्नी कांचनाबाई चरणसिंग गावीत यांच्या खात्यावर जमा झाली.

बातम्या आणखी आहेत...