आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद‎:चित्रकला स्पर्धेत 300 विद्यार्थ्यांचा‎ मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ‎ महाविद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेला‎ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५ वी ते‎ ७ वी आणि ८वी ते ९ वी अशा दोन गटात सुमारे ३००‎ विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. लहान‎ गटाला स्वच्छ भारत अभियान व मोठ्या गटाला‎ ऐतिहासिक वास्तू असे विषय देण्यात आले होते.‎ बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या‎ नूतनवर्षा वळवी होत्या.

एस. ए. मिशन इंग्लिश‎ मीडियमच्या मुख्याध्यपिका डॉ. सुनीता अहिरे, मराठी‎ मीडियमचे पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना‎ जांबीलसा, ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक छोटू बोरसे,‎ ज्येष्ठ शिक्षक अरुण गर्गे, अविनाश सोनेरी,‎ पु.ना.गाडगीळ अँड सन्स शाखेचे मुख्य व्यवस्थापक‎ किशोर थोरात व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचे‎ परीक्षण कला शिक्षक प्रसाद दीक्षित चिदानंद तांबोळी‎ व आशिष वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद‎ दीक्षित यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...