आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी कुठे प्रवेश घ्यावा, यासाठी आता पालक वर्ग अनुभवी पालकांकडून मार्गदर्शन घेत आहेत. आर्थिक परिस्थिती, मुलांची गुणवत्ता, असलेल्या जागा याचा ताळमेळ घालून मुलांना नेमका कुठे प्रवेश मिळेल, यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.
जिल्ह्यात १५ हजार ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील तीन महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखा आहेत. डी.फार्मसी, बी.फार्मसी तसेच शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी क्षमता विचारात घेता कुठल्या क्षेत्रात मुलांनी करिअर करायचे, याचा निर्णय दोन दिवसांत पालक व विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. डी.फार्मसी, बी.फार्मसी, तंत्र निकेतन याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. आयटीआय, कृषी महाविद्यालय, शहाद्यात फलोत्पादन महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संधी आहे. डी.फार्मसी, बी.फार्मसी, तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल
कला, वाणिज्य, विज्ञानसाठी सर्वाधिक जागा
जीटीपी महाविद्यालयात एफवायबीए प्रवेशासाठी ७२० विद्यार्थी क्षमता, एफवायबीकॉमसाठी ५२० तर एफवायबीएसस्सीसाठी ३२० जागा आहेत. तर जिजामाता महाविद्यालयात कला ७२०, एफ वाय बीकॉम १२० व एफ वाय बीएस्सी १२० अशी विद्यार्थी क्षमता आहे. महिला महाविद्यालयात कला शाखेत ३६० तर वाणिज्य साठी १२० अशा ४८० विद्यार्थिनींची क्षमता आहे.
फार्मसीसाठी ३०० जागा उपलब्ध
जिजामाता शिक्षण संस्थेचे डी फार्मसी ६०, नंदुरबार तालुका विधायक समिती ६०, पी.जी. स्कूल ६० व के.डी. गावीत हायस्कूल ६० अशी एकूण २४० विद्यार्थी क्षमता आहे. तर बी.फार्मसीसाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचा वाणिज्य, कला शाखांकडे कल
विज्ञान शाखेत गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कृषी, वैद्यकीय व्यवसाय, व्यावसायिक पालकाच्या मुलांचा कल अर्थात वाणिज्य शाखेकडे दिसून आला. तर कला शाखेत प्राध्यापक व इतर कला गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा ओढा असतो. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ हजार ९३६ एवढी आहे. साधारण नंदुरबार शहरातील महाविद्यालये व अन्य अभ्यासक्रमांसाठी मिळून ३ हजार ३६९ च्या जवळपास विद्यार्थी क्षमता आहे.
कमी गुण मिळालेल्यांनाही संधी
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत तीन वर्षांनंतर पदवी व पुढे आणखी परीक्षांना तोंड द्यावे लागते. कमी गुण मिळवलेले किंवा उच्च शिक्षणासाठी पदवीधर होणे आवश्यक असल्याने अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेणे पसंत करतात. छोट्या गावात आयटीआय, बीएड, डीएड अभ्यासक्रमाची सुविधा आहे.
राेजगाराच्या संधीमुळे डी फार्मसीकडे ओढा : डी.फार्मसीसाठी १२ वी उत्तीर्ण ही पात्रता आहे. तसेच सर्वसाधारण वर्षाला ६० हजार रुपयांचे शुल्क असून परीक्षा शुल्क वेगळे भरावे लागते. डी.फार्मसीनंतर रोजगार, व्यवसाय व नोकरीची संधी मिळत असल्याने विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांचा कल डी.फार्मसीकडे अधिक आहे. बी.फार्मसी केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात नोकरीची संधी मिळते. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्याकडे वळतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.