आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:जिल्ह्यातील 340 प्राथमिक शिक्षकांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ३४० प्राथमिक शिक्षकांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षक परिषदेने केलेल्या पाठपुराव्याअंती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करून ते निर्गमित केले आहेत. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या न्यायालयीन लढ्यास अभूतपूर्व यश मिळाले.

वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर एक स्तर वेतनश्रेणी बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील तिसऱ्या टप्प्यातील ११० प्राथमिक शिक्षक व चौथ्या टप्प्यातील २३० प्राथमिक शिक्षक यांनी एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) जिल्हा शाखा नंदुरबार यांच्याकडे न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज सादर केला होता.

३४० शिक्षकांतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड.बालाजी शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सदर याचिकांचा निर्णय हा शिक्षकांच्या बाजूने लागला होता. त्या अनुषंगाने येथील जि.प.सीईआेंना शिक्षक परिषदेने निवेदन देऊन एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना आदेश निर्गमित केले.

बातम्या आणखी आहेत...