आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:35 जणांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान; श्री संतसेना प्रेरित व्यायाम शाळेमार्फत शिबिराचे आयोजन

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुना बैलबाजार परिसरात असलेल्या समस्त गुजर नाभिक समाजाची श्री संतसेना प्रेरित व्यायाम शाळेमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक हिताचे काम मंडळाकडून जोपासण्यास आले.

कार्यक्रमाला नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक किरण खेडकर उद्योगपती नितेश अग्रवाल, डाॅ. नीलेश वळवी हे प्रमुख अतिथी म्हणून व समस्त गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे, उपाध्यक्ष नगिन सोनवणे, दिलीप सांळुंखे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, प्रसिद्धी प्रमुख भरत सोनवणे, संतसेना समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.सुभाष सोनवणे, सचिव अशोक जाधव, पंच मंडळ अंबालाल पवार, राजेंद्र नांदेडकर, नितीन होळकर, घनश्याम नांदेडकर, महिला मंडळ अध्यक्ष डाॅ संगीताताई सूर्यवंशी, सचिव सीमाताई होळकर, विभागीय अध्यक्ष अंबालाल सोलंकी, प्रदीप सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत होळकर, दत्तू होळकर, यशवंत होळकर, जीवनसर, भरत नांदेडकर, प्रकाश साळुंखे, सुरेश नांदेडकर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष मुकेश होळकर, उपाध्यक्ष गिरीश नांदेडकर, सचिव योगेश होळकर, खजिनदार दिनेश सोनवणे, सहसचिव प्रशांत होळकर आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...