आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना ३ लाखांऐवजी ४ लाखांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती रोजगार हमी विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती शहादा पंचायत समितीने दिली.प्रत्येक कुटुंबाचे कल्याण करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या रोहयो विभागाने ४ नोव्हेंबर रोजी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जाहीर केली असून, त्यानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करताना लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो, विहिरीचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यास मान्यता देण्यास विलंब होणे, अनुदान अपुरे असल्याने विहिरीची काम करण्यास अडचणी, शिवाय मजुरी आणि कुशल निधी वेळेत न मिळणे, बिल काढण्यास विलंब होणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी हैराण होतात. याबाबत रोजगार हमी विभागाकडे तक्रार दाखल केल्या जात होत्या. याबाबीचा विचार करून रोहयो विभागाने नव्याने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा विविध घटकांतील लाभार्थी पात्र राहतील.
शेतकऱ्यांना होणार फायदा
शेतानजीक आता मात्र रोहयोअंतर्गत विहीर मंजूर करताना खासगी विहिरीपासून १५० मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब या करीता लागू करण्यात येणार नाही. अतिस्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात विहिर अनुज्ञेय करता येणार नाही.
लोकसंख्येच्या प्रमाणात विहिरीची अट शिथिल
नियमानुसार सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी कितीही विहिरीची कामे सुरू असू शकतात, यासंदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजुरीची अट रद्द करण्यात आली आहे.
तालुक्यात लवकरच अंमलबजावणी करू
सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात ४ नोव्हेंबर रोजी रोहयो विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार तालुक्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.- राघवेंद्र घोरपडे, गटविकास अधिकारी, शहादा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.