आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्तारोको:40 आंदोलकांवर गुन्हा दाखल ; 10 नोव्हेंबर रोजी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी करण्यात आले होते आंदोलन

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विना परवानगीने नंदुरबार ते तळोदा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केल्याने ४० आंदोलकर्त्याच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नंदुरबार ते तळोदा हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी पोह विजय बोरसेे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दिलीप रघुनाथ पाटील, अधिकार भटा पाटील, नितीन देवन पाटील, अंबालाल तुकाराम पटेल, शांतू मोत्या पाडवी, सुरेश जम्मू पाडवी, उद्धव तूमडू पटेल, दगडू नारायण चौधरी, राकेश पाटील, प्रदीप पाटील, दीपक पाटील, खंडू वसंत पाटील, खंडू इमा पाडवी, नितीन सजन पाटील, जगदीश रवींद्र भोई, भरत रोहिदास चौधरी, संदीप पाडवी, शरद राजपूत, अश्वीन पटेल, सुभाष पटेल यांच्यासह अन्य २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...