आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागतील 40 गावांची सीमा सील

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील बोर्ड सील करण्यात आली

नीलेश पाटील 

कोरोनामुळे जगात हाहा:कार उडला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात लागण होऊन नये म्हणून महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार व गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील एकही कोरोना रूग्ण नसल्याने खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील बोर्ड सील करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यातील आजूबाजूच्या कोरोना लागण झालेले जिल्हे आहेत तापी जिल्ह्याच्या बाजूला सुरतला 27 तर नंदुरबार जिल्ह्यातील शेजार मध्य प्रदेश सेंधवा व धुळे जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याने नवापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील 40 गावाची बोर्डर सील करण्यात उपाययोजना केल्या आहेत आहेत दोन्ही आदिवासी जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस व गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील उच्छल पोलीस नागपूर सुरत महामार्गावर खडा पहारा देत आहे. सोबत आरोग्य विभागाची टीम परिवहन अधिकारी उपस्थित आहे.

बातम्या आणखी आहेत...