आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:तंबाखूमुक्त शाळा अभियानात 100 शाळांतील 4 हजार विद्यार्थी सहभागी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १०० शाळांमध्ये तंबाकुमुक्त अभियान राबवण्यात येत असून नवापूर तालुक्यातील ५० व नंदुरबारमधील ५० शाळांमध्ये ४ हजार २५२ विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त अभियानात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी तंबाखू सेवनापासून दूर होण्यास मदत होत आहे. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली असून यापुढेही हे अभियान सुरूच राहील, असे नवनिर्माण संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

नवनिर्माण संस्थेने गावातील १६ स्वयंसेवकांच्या मदतीने सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्याने तंबाखू मुक्त उपक्रम राबवला गेला. यात १०० शाळामध्ये चार सत्र व चार उपक्रमाच्या मदतीने ही जनजागृती करण्यात आली. पहिल्या सत्रांमध्ये ‘तंबाखू आहे जीवघेणा, म्हणून त्याला नाही म्हणा’ या सत्रामध्ये मुलांना तंबाखूचे दुष्परिणाम विषयी माहिती देण्यात आली. तंबाखूचे सेवन केल्याने कुठल्या प्रकारचे आजार होतात तसेच शरीराला तो किती घातक आहे, त्यातील घातक रसायने याविषयी मुलांना माहिती देण्यात आली.

गावपातळीवर तंबाखू मुक्तीची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये तंबाखू विरोधी घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये गावातील महिला व युवक मंडळ ग्रामस्थांनी सहभाग घेतला. तसेच शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये सातत्य व लक्ष राहण्यासाठी चॅम्पियन ग्रुप तयार करण्यात आले. यात प्रत्येक शाळेतील पाच मुलांना सहभागी करून घेतले. तंबाखू मुक्त स्वच्छ आरोग्यसंपन्न शाळा आणि परिसर उपक्रमाचे विषयी व त्यांच्या कामाची माहिती त्यांना देण्यात आली. १०० शाळांमध्ये रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये एकूण ४ हजार १२५ विद्यार्थी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...