आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:13 ते 70 वयोगटातील 4 हजार महिलांच्या 25 मिनिटांच्या घुमर ने केला रेकॉर्ड

नंदुरबार6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुरव चौकाजवळील मैदानात १३ ते ७० वयोगटातील ४ हजार महिलांनी २५ मिनिटांचा घूमर नृत्य करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन यूके) मध्ये नंदुरबारचे नाव अधोरेखित केले, अशी व्हाइस प्रेसिडेंट राजीव श्रीवास्तव यांनी कार्यक्रमात घोषणा केली. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांनी नवा इतिहास निर्माण करताच जल्लोष करण्यात आला.

प्रियंका जगदीश माने यांच्या संकल्पनेतून घुमर नृत्याचा कार्यक्रम रविवारी रात्री पार पडला. राखी नीलेश तवर,कुणाल वीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन राजस्थानमधील विष्णू पारीख, किरण दाभाडे यांनी केले. नागसेन पेंढारकर यांनी आभार मानले.

नंदनगरीत अवतरली राजस्थानी संस्कृती
नंदुरबार शहरात जिल्ह्यातील महिलांना एकत्रित आणून घुमर नृत्य, नंदुरबारचे लेझीम नृत्य सादर केले. चार हजार महिलांनी राजस्थानी पेहराव घातल्याने महाराष्ट्रात राजस्थानी संस्कृतीच अवतरल्याचे चित्र होते. स्थानिक आदिवासी कलावंतांनी आदिवासी नृत्य सादर केले.

अभिनेत्रींच्या उपस्थितीने आली रंगत
अभिनेत्री मानसी नाईक, स्मिता जयकर, अभिनेत्री सुप्रिया पठारे, लावणी सम्राट किरण कोरे व रेखा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमात रंगत आली. प्रशंसा तवर हिने स्वागत नृत्य केले. शीतल चौधरी, तेजल चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

दोन महिन्यांपासून अथक परिश्रम : गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत जागतिक रेकाॅर्ड करण्यात आला. खासदार डॉ. हीना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...