आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंत्रालयातील माजी कक्ष अधिकारी राजेंद्रकुमार गावित आणि त्यांच्या पत्नी तथा तत्कालीन पोलिस निरिक्षक इला गावित यांच्या घरावर नंदुरबार एसीबीने छापेमारी केली आहे. यात काय सापडले, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, रविवारी गावित दांपत्याविरोधात 42 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी धुळे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील रहिवासी असलेले राजेंद्रकुमार गावित 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी पोलिस निरिक्षक या पदावर होत्या. सात वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकसी सुरू होती.
चौकशीदरम्यान गावित कुटुंबाच्या 2005 ते 2013 मधील शासकीत संपत्ती आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यात आला. यात गावित यांच्याकडे आपल्या उत्पन्नापेक्षा 42 लाख 49 हजार 390 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. तसेच, त्यांच्या पत्नीने ही मालमत्ता आपल्या नावे केल्याचेही चौकशीत आढळले. त्यावरुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.