आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज छाननी:142 सदस्यपदासाठी 466 अर्ज वैध

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या १४२ सदस्यपदासाठी ४६६ तर १८ सरपंचपदासाठी ९३ नामांकन अर्ज छाननी अंती वैध ठरले. छाननी दरम्यान नऊ जणांचे अर्ज तर सरपंचपदाचा एक अर्ज अवैध ठरला.खैराळे सदस्य २०, सरपंच ६, कोठडे सदस्य २३, सरपंच ६, तिसी सदस्य १७ सरपंच ५, कानळदे सदस्य ७, सरपंच २, करणखेडा सदस्य २०, सरपंच ४, सातुर्खे सदस्य ८, सरपंच ४, राकसवाडे सदस्य २०, सरपंच ५, घुली सदस्य १२, सरपंच ४, रनाळे सदस्य ७४, सरपंच ९, अमळथे सदस्य १०, सरपंच ३, ढंढाणे सदस्य १७, सरपंच ४, धानोरा सदस्य ४३, सरपंच ६, ओसर्ली सदस्य २१, सरपंच ४, तलवाडे बु. सदस्य ३१, सरपंच ५, घोटाणे सदस्य २८, सरपंच ४, चौपाळे सदस्य ३५, सरपंच ५, रजाळे सदस्य २८, सरपंच ९ आसाणे सदस्य ५१ तर सरपंचपदासाठी ८ जणांनी नामांकन अर्ज दाखल केला.

नऊ उमेदवारांचे अर्ज छाननी अंती बाद करण्यात आले. यात वैधता प्रमाणपत्र नसणे, शैक्षणिक पात्रतेचा अभाव, वय कमी, जात वैधता प्रमाण पत्र नाही, पोहच पावती नाही, या कारणावरून छाननीत अर्ज बाद करण्यात आले. १८ ग्रामपंचायतीसाठी एकूण १४२ सदस्यपदासाठी निवडणूक होत असून पुरूष मतदारांची संख्या १२ हजार ६०७ तर महिला मतदारांची संख्या १३ हजार ३०७ एवढी असून एकूण मतदार २२ हजार ५२० एवढे आहेत, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...