आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवल्याने जास्तीचा परतावा मिळतो, असे आमिष दाखवून बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकाने ४९ लाख ८९ हजार ४७२ रुपयांची फसवणूक केल्याने दोघांसह नवापूर येथील स्टेट बँकेच्या तत्कालीन अधिकारी अशा तिघांविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवल्याने जास्तीचा परतावा मिळेल, असे सांगून जानेवारी २०२० पासून आजपर्यंत जयसिंग दिवाणजी गावित याने स्टेट बँक ऑफ इंडियात वेळोवेळी पैसे भरल्याच्या पावत्या दाखवल्या.
प्रत्यक्षात स्टेट बँकेत पैशांचा भरणाच केला नसल्याने संदीप कांतीलाल गावित यांनी नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जयसिंग दिवाणजी गावित, रा.झामणाझिरा, रविकांत नकुल वळवी व बँकेचे तत्कालीन अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञारेश्वर वारे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान एवढ्या माेठ्या प्रमाणात फसवणुकीचा या गुन्ह्याचा कसून तपास हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.