आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालय अधिनस्त कार्यरत परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय अर्थात शासकीय नर्सिंग महाविद्यालयात सन २०२२ -२३ या वर्षासाठी एएनएम अर्थात सहाय्यक परिचारीका मिडवाईफरी व जीएनएम अर्थात जनरल नर्सिंग प्रशिक्षणासाठी प्रवेश विद्यार्थी क्षमता वाढवण्यात आली आहे. प्रत्येकी दोन्ही कोर्ससाठी २०२२:२३ या वर्षाकरीता प्रत्येकी ४० असे एकूण ८० विद्यार्थी दाखल होणार आहेत. आलेल्या अर्जांपैकी निवड झालेलया विद्यार्थिनींची निवड यादी ६ जानेवारी रोजी महाविद्यालयात लागणार आहे. त्यामुळे निवड, प्रतिक्षा यादीकडे विद्यार्थीनींचे लक्ष लागून आहे. ५५० विद्यार्थिनींनी अर्ज भरला आहे. १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षणास निवड होण्याकरीता अर्ज मागवण्यात आले होते.
त्यानुसार एएनएम प्रशिक्षण करीता ९४ व जीएनएम प्रशिक्षण करीता ४५६ अर्ज विक्री झाले होते. ते अर्ज इच्छुकांनी सदर केले असून प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी ६ जानेवारी रोजी नर्सिंग महाविद्यालयात लावण्यात येणार आहे. नर्सिंग महाविद्यालयासाठी २६ पदे मंजूर झाले आहेत. प्रत्यक्षात एकच पद भरण्यात आले आहे. उर्वरित २५ रिक्त पदांवर जिल्हा रूग्णालयातील अहर्ताधारक अधिपरिचारीका कार्यरत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे.
परिचारिकांना आधी मानधन दिले जात नसे. आता मानधन सुरू झाले आहे. त्यामुळे प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतन मिळणार असल्याने गरीब विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. परिचारिकांच्या परीक्षेसाठी पूर्वी धुळयात परीक्षा केंद्र होते. मात्र सातत्याने पाठपुरावा केल्याने नंदुरबार शहरात परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यात आल्याने परिचारिकांना नंदुरबारमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे धुळयाला जाण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचणार आहे. तर बीएसस्सी नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाकरिता वारंवार शासन पाठपुरावा करण्यात आला.
नर्सिंग कॉलेजमध्ये विविध सुविधा
राज्यातील परिचारिकांचे परीक्षा तपासण्याचे केंद्रही नंदुरबार झाल्याने राज्यातील प्रश्नपत्रिका नंदुरबारला तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे नर्सिंग प्रशिक्षण क्षेत्रातनंदुर बार हे आता राज्यात नावारूपाला येत आहे. नंदुरबार येथे २०१९ मध्ये नर्सिंग कॉलेज स्थापन झाले. तीन वर्षात नर्सिंग कॉलेजमध्ये विविध सुविधा निर्माण करण्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारूदत्त शिंदे प्रयत्न करीत आहेत.
वसतिगृहात २४ तास सुरक्षा
सीसीटीव्ही कॅमेरे, सुविधा युक्त महाविद्यालय, वसतिगृहात २४ तास सुरक्षा व्यवस्था असल्याने शासकीय नर्सिंग कॉलेज आता चांगलेच नावारूपाला येत आहे. प्राचार्य जितेंद्र चव्हाण, पाठय निर्देशिका नम्रता मदने, पाठय निर्देशक सुशिल केदार, आकाश केंद्र, कल्पेश पवार, संतोष मुठे, पाठय निर्देशिका सोनल कोडोलीकर, ममता ठाकरे, लेखापाल शीतल साळी, संगणकचालक सागर कोळी, परिचर मनोहर खैरनार कार्यरत असून सदर संस्थे करीता आवश्यक सर्व आर्थिक व प्रशासकीय बाबी मनोज चौधरी हे पार पाडत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.