आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नंदुरबार:बिबट्याच्या हल्ल्यात 6 वर्षीय चिमुकली ठार, 3 महिन्यांत दुसरी घटना; वनविभागाविरोधात तीव्र रोष

तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

तालुक्यातील सोजरबार या ठिकाणी पहाटेच्या सुमारास बिबट्याने झोपडीत शिरून एका चार वर्षीय बलिकेस उचलून नेल्याने या घटनेत त्या बलिकेचा मृत्यू झाला आहे. हिंस्त्रप्राण्याचे मानवावावर होणारे हल्ले हे गंभीरबाब बनली असून वनविभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

तळोदा व अक्कलकुवा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या सोजरबार येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने झोपडीत प्रवेश केला. निद्रावस्थेत असलेल्या 6 वर्षीय शीला या बलिकेवर हल्ला चढवून तिला उचलून झोपडीतून फरफटत बाहेर नेले. दरम्यान या कालावधीत तिने स्वतःला वाचवण्यासाठी धडपड केली. यावेळी तिच्या ओरडण्याचा व रडण्याचा आवाजाने तिच्या वडिलांना जाग आली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्या बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्या काही अंतरावर गेल्यानंतर मुलीस तिथेच सोडून फरार झाला. दरम्यान यावेळी त्या बलिकेच्या डोक्यावर, गळ्यावर, जबड्यावर, पार्श्वभागावर, गंभीर जखमा झाल्या. त्या बलिकेस तात्काळ उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तीस मयत घोषित केले. सदर घटना ही सोमावल बिटातील सोजरबार येथे घडली असून वनविगाकडुन घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी वनक्षेत्रपाल सी.डी.कासार सहायक वनसंरक्षक कापसे, वनक्षेत्रपाल अक्कलकुवा सोनाली गिरी, हवालदार मोहन वळवी, पो नाईक, दिनकर गुले, बोरदचे वनपाल आंनद पाटील, वनरक्षक आर जे शिरसाठ, विरसिंग पावरा, राज्या पावरा, श्रावण कुंवर, एस आर. देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही 3 महिन्यात दुसरी घटना आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यात व शेतात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.