आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितवी गट:69.76 टक्के मतदान; आज मतमोजणी

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चितवी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी ६९.७६ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ३३ टक्के तर ३.३० वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत तालुक्यात प्रथमच महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्यात आला. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील सुरेश गावित यांना उमेदवारी दिली होती. गावित व अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित या दोघांमध्ये सरळ लढत झाली. ६ रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य सुरेश सुरूपसिंग गावित यांचे कोरोना काळात निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. अडीच वर्षांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजप तसेच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस व शिवसेनेने दिवंगत जि.प. सदस्य गावित यांना श्रद्धांजली म्हणून उमेदवार दिले नाही.

पोलिस अंमलदारांचा चोख बंदोबस्त
सर्व मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना निळे-ठुबे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी हे सर्व निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते. विसरवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन पाटील, पोउनि भूषण बैसाणे, प्रशांत राठोड, विकास गुंजाळ यांच्यासह ४५ पोलिस अंमलदारांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

बातम्या आणखी आहेत...