आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायती बिनविरोध:धडगाव तालुक्यातील 44  ग्रा.पं.साठी 78.25  टक्के मतदान

धडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी ७९.०३ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर उमेदवारी माघारीच्या अखेर एकूण तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यात सावऱ्यादिगर, शिरसानी व शेलदा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

उर्वरित ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत एकूण ५१ हजार १४७ मतदारांपैकी ४० हजार २३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १९ हजार ४४० महिला मतदार तर २० हजार ५८३ पुरुष मतदारांचा समावेश आहे. . येथील तहसील आवारात मंगळवारी मतमोजणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...