आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीचा सूर:लाख रुपयांच्या विक्रीवर 8 पुस्तक विक्रेत्यांना मानावे लागले समाधान

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व ग्रंथालय संचालनायच्यावतीने शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयाच्या सभागृहात ८ बुक स्टॉल लावण्यात आले. दोन दिवसांत एक लाख २० हजार रूपयापेक्षा अधिक रूपयांची ग्रंथाची विक्री झाली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी पुस्तके खरेदी करण्यावर विद्यार्थ्यांचा भर होता. कोरोनाकाळानंतर भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवात कमी पुस्तके विक्री झाल्याने ग्रंथ विक्रेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसला.

जळगाव येथील दीपस्तंभचे योगेश चांदणे म्हणाले, वैचारिक,प्रबोधनात्मक तसेच प्रेरणादायी पुस्तकांना यंदा मागणी दिसली.दोन दिवसांत ख्ुप कमी ग्रंथांची विक्री झाली..अर्थशास्त्र,भुगोल,स्पर्धा परीक्षा या पुस्तकांची विक्री झाली. सुजय बुक हाऊसचे प्रकाश पाटील म्हणाले, आमच्या बुकस्टॉलवरून दोन दिवसांत ४० हजार रूपयांचीच पुस्तके विक्री झाली. महापुरूषांची पुस्तके, आत्मचरित्र, वैचारिक पुस्तके विक्री झाली. स्टाॅलवर मोजक्या लेखकांचीच पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...