आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवापूर आगारातून धावताहेत 8 बस; उत्पन्नही वाढतेय, ग्रामीण भागातील फेऱ्या मात्र बंदच

नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिक, चोपडा, भुसावळ, धुळे, विसरवाडीसाठी सेवा; प्रवाशांची सोय

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संपावर गेले आहेत. पाच महिन्यांपासून बंद असलेली बससेवा हळूहळू सुरू होत आहे. काही चालक, वाहक, कार्यालयीन कर्मचारी तसेच सहाय्यक आॅटोआर्ट कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली आहे. या अनुषंगाने नवापूर आगारातून लांबपल्ल्याच्या आठ बसेस सुरू करण्यात आले आहेत. संपादरम्यान सुरू करण्यात आलेल्या ८ बसेसचे नियमित उत्पन्नापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवत आहेत. बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवापूर आगारातील सर्व बसेस फुल्ल भरत असून आर्थिक उत्पन्न देखील वाढत आहे. नवापूर शहरात संपादरम्यान खासगी वाहतूक करणाऱ्यांनी प्रवासी भाडे दुप्पट केल्याने प्रवासी आर्थिक संकटात सापडले आहे. लांबपल्ल्याच्या मोजक्या बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. अव्वाच्यासव्वा भाडे वाढीपासून सुद्धा सुटका झाली आहे.ग्रामीण भागातील लालपरीची चाके गेल्या आठ नोव्हेंबरपासून बंद झाली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे.

नवापूर आगारातून धावणाऱ्या बसेस
नवापूर-नाशिक चार बसेस सुरू करण्यात आले आहेत. नवापूर-चोपडा दोन बसेस, नवापूर-भुसावळ एक बस, नवापूर-धुळे एक बस, मानव विकास विद्यार्थी बससेवा वागदी-विसरवाडी एक बस असे एकूण आठ बसेस सुरू झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी एक बस सुरू... नवापूर आगारातील आठ बसेस तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मानव विकास अंतर्गत एक बस सुरू करण्यात आली आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने बस सेवा वाढवण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी केली आहे. एक बस विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्याने काहीसा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

लांबपल्ल्याच्या बसेसची अशी वाढली आवक
नवापूर-नाशिक बस आधी एक फेरीत १२-१३ हजार रूपये येत होते सध्या २४-२५ हजार रूपये येत आहे.
नवापूर-चोपडा बस आधी एका फेरीत १३‌-१४ हजार रूपये, सध्या २०-२२ हजार रूपये येत आहे.
नवापूर-भुसावल आधीची आवक १०-१२ हजार रूपये, सध्या २१-२२ हजार रूपये येत आहे.
नवापूर-धुळे बसची आवक ७-८ हजार,सध्या १०-१२ हजार रूपये वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...