आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार आगारात १०६ बसेस पैकी ८० बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. काही तर अत्यंत खराब परिस्थितीत आहेत. बसेसच्या बॉडी अक्षरशः हलतात. गाडीतून मोठा आवाज होतो. टायर खराब असल्याने पंक्चर होणे, गिअर अडकून बस नादुरुस्त होऊन प्रवास ठप्प होण्याचे प्रसंग नियमित घडतो.
अनेक बसेस तर निकामी झाल्या आहेत. गाड्यांची दुरावस्था झाली आहे. जवळपास ८० टक्के जुन्या बसेस आहेत. तसेच लागणारे स्पेअरपार्ट्स उपलब्ध नाहीत. आगारातून निघाल्यावर काही बसेस बंद पडत आहेत. अशामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच टायर चिकने झाले आहेत. काहींचे तर तारा दिसत आहेत, असा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. याबाबतीत एसटी प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे.
बंद पडलेल्या बसने प्रवाशांना फोडला घाम नंदुरबार डेपोमधून सुटणारी बोराळा एसटी बसचा (क्र.एमएच-१४-बीडी-१३५३) अचानक गिअर ब्लॉक झाल्यामुळे मुख्य उड्डाणपूलाच्या रहदारीवर बंद पडली. या गाडीतील एसटीतील सर्व प्रवासी, विद्यार्थीनी उतरवून बसला धक्का मारला. त्यामुळे सर्वांनाच घाम फुटला.
खराब टायरमुळे १२ बसेस जागेवरच उभ्या नंदुरबार एसटी आगारातील बसेसचे टायर खराब असल्याने जवळपास १२ बसेस आगारात उभ्या आहेत. तसेच वरीष्ठ पातळीवर स्पेअरपार्ट, ऑईल पाठवले जात नसल्याने एसटी कार्यशाळेत दुरूस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुगाड करून एसटी बसेस दुरूस्ती कराव्या लागत आहेत.
लवकरच ३० नव्या बसेस दाखल होणार एसटी आगारात दीड महिन्यात ३० नव्या बसेस दाखल होणार आहेत. बसेसचे रुपांतर सीएनजीमध्ये करण्याचे धोरण आहे. आगारात १०६ बसेस आहेत. या सर्व गाडया चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. गाड्या बंद पडणे, त्या दुरूस्त करणे हे रूटीन आहे. मनोज पवार, व्यवस्थापक,आगार,नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.