आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ ग्रा.पं.साठी सुरळीत पार पडली प्रक्रिया:नवापूर तालुक्यामध्ये 84 टक्के मतदान

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी ८४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच वेळ असताना उशीरापर्यंत मतदान सुरू हाेते. नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रा.पं.साठी सहा वाजेपर्यंत तर खडकी ग्रुप ग्रा.पं.च्या ५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पिंपळा येथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान सुरू हाेते.

पिंपळे मतदान केंद्रावर १ हजार ९२ पैकी ९६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकाऱ्यांनी साडेसात वाजेपर्यंत मतदारांना रांगेत उभे करून चिठ्ठीवर क्रमांक लिहून मतदानाची प्रक्रिया राबवली. मतदारांची संख्या जास्त असल्याने या केंद्रावर दोन बूथ निर्माण करण्याची मागणी मतदारांनी केली आहे. नांनगीपाडा ग्रा.पं.साठी साडेतीन वाजेपर्यंत ९२ टक्के मतदान पूर्ण झाले हाेते. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केल्याने ही टक्केवारी वाढवली आहे.

तेथील ६६१ पैकी ६०७ मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील सर्वात मोठ्या विसरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले आहे. एकूण ४ हजार ५७६ पैकी २ हजार ९७६ मतदारांनी मतदान केले. तेथे लाेकनियुक्त सरपंच पदासाठी २ तर सदस्यांसाठी जवळपास ३२ उमेदवार रिंगणात आहे.

बातम्या आणखी आहेत...