आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मेडिकल कॉलेजमध्ये 86 विद्यार्थ्यांना प्रवेश ; तिसरी बॅच प्रवेशित, वसतिगृहाची आवश्यकता

नंदुरबार / रणजित राजपूत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या बॅचच्या ८६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून राज्यकोटातून ८२ तर देशाच्या कोटयातून ४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ८ ते १२ डिसेंबर दरम्यान दुसऱ्या राउंडमधून राज्याच्या कोट्यातून ३ तर देशाच्या कोटयातून ११ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

नंदुरबार शहरात कोविड सुरू असतानाच पहिली बॅचला प्रारंभ झाला. दोन वर्षात तिसरी बॅच आता कार्यान्वित झाली आहे. तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सद्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय गतीशील झाले आहे. या महाविद्यालयात आता वसतिगृहाची गरज असून विद्यार्थी तसेच पालकांनी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची भेट घेत विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगले वसतिगृह तसेच चांगले उपहार गृह सुरू करण्याची विनंती केली.तसेच या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. शिवाजी सुक्रे यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचा पहिल्या बॅचचे ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यात नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश असणार आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. विविध प्रकारचे आजार असलेले रूग्णांची तपासणी करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयात आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित हे प्रयत्निशल असून लवकरच नोकर भरती केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...