आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:कळंबू विद्यालयाचा 95.78 टक्के निकाल

सारंगखेडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.जी.बी. शेतकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळंबू येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा ९५.७८ टक्के निकाल लागला आहे. प्रथम क्रमांकाने दोन विद्यार्थिनींनी समान गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मानसी बोरसे व ऋतुजा देवरे यांनी प्रत्येकी ९२.०० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच द्वितीय क्रमांक वैशाली कोळी हिला ९१.२० टक्के व तृतीय भूमिका भावसार हिला ९०.६० टक्के मिळवत यश संपादन केले. विद्यालयातील एकूण ९५ विद्यार्थी प्रविष्ट होते. ९५ विद्यार्थ्यांपैकी ९१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष विजयराव बोरसे, संस्थेचे सचिव दत्तात्रय मोरे यांनी यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...