आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:विना परवानगी मिरवणूक अन् लेझर शोचे‎ आयोजन केल्याने 2 मंडळांवर गुन्हा दाखल‎

नंदुरबार‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रोकडककेश्वर हनुमान व्यायाम‎ शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी विना परवानगी‎ छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक‎ काढली. तर भाजप वारियर्सच्या‎ पदाधिकाऱ्यांनी विना परवानगी लेझर शोचे‎ आयोजन करून मनाई आदेशाचे उल्लंघन‎ केल्याचा ठपका ठेवत शहर पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिवजयंतीला‎ परवानगी न घेता मिरवणूक व लेझर शो‎ केला होता.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मार्च रोजी आदेश‎ निर्गमित केले होते. त्या आदेशाचे उल्लंघन‎ केल्याने पोलिसांनी कारवाई केली.‎

रोकडेश्वर हनुमान व्यायाम शाळा‎ मंडळाचे अध्यक्ष गौरव सोनवणे यांच्या‎ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. पोह अतुल बिऱ्हाडे यांच्याकडे‎ तपास देण्यात आला आहे.‎ नंदुरबार-शहरातील जळकाबाजार‎ चौकात १० मार्च रोजी भारतीय जनता पार्टी‎ वारियर्स मंडळाने कोणतीही परवानगी न‎ घेता लेझर शोचे आयोजन केल्याने राजेंद्र‎ उमराव बोराळे यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. भारतीय‎ जनता पार्टी युवा वारियर्स मंडळाचे अध्यक्ष‎ दीपक भगवान चौधरी व मंडळाच्या‎ सदस्यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.‎ जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आधीच‎ मनाई आदेश दिले होते. त्याचे उल्लंघन‎ झाल्याचा ठपका या दोन्ही मंडळांवर‎ ठेवण्यात आला आहे. पोलिस पुढील‎ तपास करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...