आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:नंदुरबारात पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या सभासदांचा गाैरव

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दि नंदुरबार मर्चंट काे-अाॅपरेटिव्ह बँकेतर्फे अमृत सिद्धी योजनेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांसाठी ११०० रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले आहे. तर सभासदांसाठी आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली असून बँकेचे संस्थापक चेअरमन किशोर वाणी यांच्या हस्ते योजनेतील लाभार्थी सभासदांना धनादेश वितरित करण्यात आले.

दि नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक तर्फे सभासदांच्या बँक हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. त्यानुसार ७५ वय वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांना अमृत सिद्धी योजनाअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आले. त्यात कमलाकर वाणी, मंगलगीर गोसावी, रामकृष्ण मराठे, पीतांबर सरोदे, डॉ.फैजी होरा, तुकाराम विठ्ठल चौधरी, सुरजमल तोष्णीवाल यांचा समावेश आहे.

याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन किशोर वाणी, व्हा.चेअरमन बळवंत जाधव, संचालक सुरेश जैन, प्रमोद पाटील, मच्छिंद्र मगरे, कृष्णा गांधी, राजेंद्र जैन, दिलीप शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के.टी. पाटील उपस्थित होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...