आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:कुढावद ते औरंगपूर रस्त्यावरील‎ नाल्यात आढळला मृत बिबट्या‎

शहादा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर‎ तालुक्यातील कुढावद-औरंगपूर‎ रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला‎ असलेल्या नाल्यात मादी जातीच्या‎ बिबट्यामृतावस्थेत आढळला.‎ त्याचा मृत्यू कशाने झाला हे रात्री‎ उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.‎ कुढावद ते औरंगपूर गावांच्या‎ दरम्यान रस्त्याला लागूनच कोरडा‎ छोटासा नाला असून, त्यात‎ शेतमजुराला बिबट्या मृत अवस्थेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिसून आला.

त्याने गावात जाऊन‎ कुढावद येथील पोलिस पाटील भरत‎ पाटील यांना माहिती दिली. त्यांनी‎ शहादा येथील वनविभागाच्या‎ अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरा वन‎ अधिकारी संजय पाटील यांनी‎ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी‎ भेट देऊन बिबट्याची पूर्ण पाहणी‎ करून पंचनामा केला.‎ आजारपणामुळे तो मृत झाला‎ असावा असा प्राथमिक अंदाज‎ वर्तवण्यात येत आहे. मृत बिबट्या‎ हा मादी जातीच्या असून, त्याचे वय‎ साधारणतः एक ते सव्वा वर्ष असेल.‎ त्याच्या शरीरावर कोणत्याही‎ प्रकारच्या जखमा नसल्याची माहिती‎ पाटील यानी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...