आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा तालुक्यातील विसरवाडी येथील हार्दिक पेट्रोल पंपावर मोटरसायकलीत पेट्रोल भरताना आगीचा भडका उडाला. मात्र युवकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. तालुक्यातील विसरवाडी गावातील हार्दिक पेट्रोल पंपावर साडे पाच वाजेच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका युवकाच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यामुळे काय करावे हे येथील लोकांना समजले नाही.
पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या इतर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पेट्रोल पंपावर लागलेली आग पाहून लोक सैरावैरा पळू लागले. दरम्यान त्या ठिकाणी असणारे कर्मचारी अमोल गावित यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फायर फायटरचा सिलिंडर फोडून तत्काळ आग विझविली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. अमोल गावित याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.