आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:15 हजार लाच मागणारा वनपाल आला जाळ्यात; अटक

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन विभागाने पकडलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजारांची मागणी करणारा वनपाल सुनील पाटील याला अटक झाली.

शहरातील एकाची पिकअप आहे. त्यावर त्यांचा मुलगा उदरनिर्वाह करतो. काही झाडे तोडल्यानंतर ती या पिकअपमधून नेली जात होते. त्यावेळी वनविभागाने पिकअप पकडली. त्यानंतर तकारदारांनी वनविभागात धाव घेतली. वनपाल सुनील आधार पाटील ( वय ५७ ) यांनी पिकअप सोडण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. याबाबत सबंधित नागरीकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणीनंतर सुनील पाटील यांनी लाच मागितल्याचे समोर आले. कारवाई वेळी सुनील पाटील सावध झाले. त्यामुळे त्यांनी लाच स्विरकारली नाही. पण लाचेची मागणी केल्यने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

बातम्या आणखी आहेत...