आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर तालुक्यातील फरार आरोपीस पकडण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले आहे. फत्तेसिंग बाबजी मावची (रा. तिनटेंबा ता.नवापूर जि. नंदुरबार) याच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी १९८४ रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा ३९ वर्षापासून आरोपी फरार होता. तो व्यारा शहरातील एका कापड मिलमध्ये मजुरीला असून तो त्याची पत्नी व तिन मुलांसह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील आमली पोस्ट वझरदा (ता. सोनगढ) येथे वास्तव्यास राहात असल्याची माहीती मिळाली. नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी सदर बातमीची खात्री करून फरार आरोपी अटकसाठी नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात रवाना केले.
नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा शहर गाठून तेथे फरार आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची याचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु आरोपी हा ३९ वर्षापासून फरार असल्याने त्याचा फोटो किंवा इतर माहिती पथकाकडे नव्हती. व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करून फिरत होता. त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते. अखेर शोध घेऊन त्यास अटक केली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्याच्या पथकास १० हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले. ही कारवाई नवापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक अशोक मोकळ, हवालदार दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, सुनील निकम यांच्या पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.