आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीपाचे नुकसान:खरीपाच्या नुकसानपोटी साडेबावीस कोटींचा निधी ; २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा लाभ

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल दिनानिमित्त नैसर्गिक आपत्तीत २०२१ मध्ये खरीपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २२ कोटी ५० लाख मंजूर झाले असून २२ कोटी ५० लखांचा धनादेश युनियन बँक ऑफ इंडियाला सुपुर्द करण्यात आला. बँक मार्फत २१ हजार शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम वितरीत केली जाणार आहे. कुटुंब प्राधान्य, कुटुब योजना, शिधापत्रिका, सात बारा, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या महसुल कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत महसूल दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच या वेळी ८ सातबारा, १० दाखले, ६ पिवळया शिधापत्रिका, नवीन वितरीत शिधापत्रिका, दहा विधवा व निराधार स्त्रियांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांत समावेश करण्यात आला. १९ लाभार्थ्यांना कटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धनादेश वितरण करण्यात आले. अंजनाबाई राजू वाघ, परिबाई रमण भिल (भोणे), सुमित्राबाई गाविंद (कोठली खु.) यांसह १९ महिलांना प्रत्येकी २० हजारांचा धनादेश व ितरीत करण्यात आला. तसेच २०२१ मध्ये २१ हजार शेतकऱ्यांना खरीप पिकमध्ये नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना २२ कोटी ५०लाख रुपये वितरीत करणार आहेत. भाऊसाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले.

यांना केले सन्मानित
निवासी नायब तहसीलदार नितीन रमशे पाटील, अव्वल कारकून प्रिती पाटील, महसूल सहाय्यक दौलत राजाराम वळवी, आष्टे मंडळ अधिकारी मदन कावळे, तलाठी बाळू धनगर, शिपाई गिरीश सुदाम देवांग, कोतवाल किशाेर बाबू पाडवी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.

बातम्या आणखी आहेत...