आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खऱ्या ज्ञानाचा सामान्यांना परिचय होण्यासाठी संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांकडून राबवण्यात आली विशाल ग्रंथसेवा

बोरदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात 22 हजार 200 ग्रंथ घोघरी पोहोचवले

​​​​​मुनिंदर धर्मार्थ ट्रस्ट हरियाणा अन्वये संत रामपालजी महाराज यांच्या आदेशानुसार ‘हर घर पुस्तक’ या योजनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गाव, खेडे, शहर तसेच डोंगराळ भागातील गावापर्यंत पुस्तक सेवेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांत २२ हजार २०० ग्रंथांची सेवा झाल्याचे सहभागी अनुयायांकडून सांगण्यात आले.

या पुस्तक सेवेसाठी मुनिंदर धर्मार्थ ट्रस्टकडून जगत गुरू रामपालजी महाराज यांच्या अनमोल अशा ग्रंथांनी समृद्ध बस पाठवली होती. सोबत या विशाल सेवेसाठी सेवा देणाऱ्या अनुयायांना प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या बसचा मोठा उपयोग झाला. प्रत्येक तालुक्यानुसार काही दिवसांची ही सेवा आयोजित केली होती. ज्यामध्ये २०० पाने असणाऱ्या पुस्तकाची किंमत अवघी १० रुपये ठेवली होती. त्यामागील उद्देश म्हणजे निदान आपण पैसे खर्च केले आहेत या भावनेतून ग्रंथ घेणारे ते ग्रंथ वाचतील. मोफत दिले असते तर त्यांना त्या ग्रंथाचे महत्त्व कळाले नसते, असे अनुयायी म्हणाले.

नाव नोंदणी करून अनेक अनुयायांची ग्रंथसेवा
सेवा देणाऱ्यांकडून ग्रंथ घरापर्यंत पोहोचवून समाजाला मग तो कुठल्याही समाजाचा, धर्माचा असो त्यांना खऱ्या ज्ञानाचा परिचय व्हावा म्हणून ही विशाल अशी ग्रंथ सेवा आयोजित करण्यात आलेली होती. या ग्रंथ सेवेसाठी जिल्हाभरातून अनेक अनुयायांनी आपली नाव नोंदणी केली होती. आणि गेल्या पाच दिवसांपासून सेवा देत होते. या पाच दिवसाच्या सेवेत साधारण २२ हजार २०० ग्रंथांची सेवा झाल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...