आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा प्रवास:शिक्षणाच्या वाटेवर जंगलातील नाल्यातून जीवघेणा प्रवास

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : नीलेश पाटील, नवापूर - Divya Marathi
छाया : नीलेश पाटील, नवापूर

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. उमराणी गावाअंतर्गत काल्लेखेतपाडा शाळेत शिकणारे सावरीपाडा, देवपाडा, मोवाडीपाडा, पाटीलपाडा, होळीपाडा, खालचापाडा, नीलपीपाडा या पाड्यावरील ६० ते ७० विद्यार्थ्यांना शाळेत जाताना वाहता नाला ओलांडावा लागतो. सध्या या नाल्याला पूर आला असून त्यामुळे चिमुकल्यांना दररोज दोरीच्या साहाय्याने नाला पार करावा लागतो. या वेळी शिक्षक, ग्रामस्थदेखील नाल्यात उभे राहून मदत करतात.

जिल्हा परिषद काल्लेखेतपाड्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत २०५ विद्यार्थी असून चार शिक्षक आहेत. या शाळेला बारा पाड्यातील विद्यार्थी येतात. शाळेलगत असलेल्या नाल्यांना जानेवारीपर्यंत पाणी असते.

बातम्या आणखी आहेत...