आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांवर लक्ष ठेवा:सहा वर्षांची मुलगी मोटरसायकलीला धडकली; घटना सीसीटीव्हीत कैद

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोटालसायकल वेगात नसल्याने मोठा अनर्थ टळला

नवापूर शहरातील बाजारपेठेत असलेली जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ काल एक लहान मुलीला मोटर सायकलीने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला यात मोटर सायकलस्वारासह लहान चिमुकली मुलगी किरकोळ जखमी झाली संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास परदेशी सायकल दुकानाकडून येणाऱ्या एका मोटारसायकलला जिल्हा परिषद इमारतीकडून धावणारी लहान मुलगी धडकली. यात लहान मुलगी मोटारसायकली खाली दाबली गेली. तत्काळ आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीच्या अंगावर पडलेली मोटरसायकल बाजूला केली. सदर मुलगी ही जिल्हा परिषद परिसरामध्ये पोत गुंफणाऱ्यांची होती. या अपघातात मोटारसायकलस्वार व लहान चिमुकली किरकोळ जखमी झाली.

रस्त्यावरील दुकानदाराने व घरातील लोकांनी लहान मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावा. रस्त्यावर अचानक येणाऱ्या वाहनांमुळे आपल्या मुलांचा अपघात होऊ शकतो. तसेच रस्त्यावरील वाहनधारकांनी देखील बाजारात व गल्लीबोळात वाहने सावकाश चालवा. लहान मुलं खेळता-खेळता रस्त्यावर येत असतात. त्यामुळे त्यांना इजा किंवा अपघातात त्यांचा बळी जाऊ शकतो. वाहन चालवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

तसेच नवापूर शहरात संध्याकाळी मेन रोडवर काही बाईकस्वार रायडींग करत असल्याचे दिसून येते. या संदर्भात नवापूर पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...