आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील वसंतराव नाईक वरीष्ठ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीचा (सेंट्रल व्हिस्टा) आढावा घेतला. यात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्टिकोनातून नवीन संसद भवनाशी संबंधित माहितीचे संकलन करून पोस्टरद्वारे प्रकट केले. संसदेच्या जुन्या इमारतीने स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. ही इमारत अनेक गोष्टींची साक्षीदार आहे. देशाच्या अनेक कर्णधारांनी या इमारतीत बसूनच देश विकासाच्या अनेक योजनांचे आराखडे बांधले. त्यांना मूर्त रूप देण्यासाठी कार्य केले.
या त्यांच्या कार्यामुळे देश आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. ही समस्त भारतीयांसाठी गौरवस्पद व अभिमानास्पद बाब आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या मंदिरात जनतेसाठी अनेक हितकर निर्णय घेतले गेले. जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. यासाठी सध्याचे कर्णधार व लोकप्रतिनिधींनी भावी काळातील राजकीय बदल, गरज, मतदार संघ पुनर्रचना, येणाऱ्या काळात लोकसभा व राज्यसभेच्या वाढत जाणाऱ्या लोकप्रतिनिधी संख्या याचा सखोल अभ्यास करून लोकशाहीचे नवीन मंदिर अर्थात सेंट्रल व्हिस्टा या नावाने सुसज्ज अशा संसद भवनाची निर्मिती केली. राज्यशास्त्र विभागातील प्रा. भटेसिंग राजपूत व प्रा. राम हजारी यांच्या मार्गदर्शनात उत्तम पावरा व संपालाल पाडवी या विद्यार्थ्यांनी सदर पोस्टर तयार केले.
सहभागी विद्यार्थ्यांचे सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, संस्थेचे प्रतिनिधी प्रा. हिमांशू जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.