आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:नंदुरबार येथील विद्यार्थ्याचा किर्गिजस्तानात उपासमारीने मृत्यू, महिनाभर जेवणच मिळाले नाही

नंदुरबारएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मृतदेह आणण्यासाठी परिवाराला सहन करावा लागला मानसिक त्रास

(रणजित राजपूत)

किर्गिजस्तान देशातील बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या नंदुरबार येथील हिमांशू भारतकुमार नुक्ते या विद्यार्थ्यांचा २९ एप्रिलला बिश्केक येथे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह तब्बल ६ दिवसांनी नातेवाइकांच्या ताब्यात मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी नंदुरबार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हिमांशूूला क्षयराेग असताना कोरोना समजून त्याला १५ दिवस क्वारंटाइन करण्यात आले. तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला खायला काहीच न दिल्याने त्याचा भुकेने करुण अंत झाला, असा गंभीर आराेप मृत विद्यार्थ्याचे काका जगदीश नुक्ते यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला आहे.

नंदुरबार येथील अॅड. भारतकुमार नुक्ते मुंबई सर्वाेच्च न्यायालयात वरिष्ठ लिपिक होते. आता ते तेथेच वकील आहेत. त्यांचा मुलगा हिमांशूने (१९) २०१९ मध्ये बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रथम वर्गात प्रवेश घेतला हाेता. हिमांशूची मार्चमध्ये प्रकृती बिघडली. त्याला कोराेना झाला असावा, असा अंदाज बांधत १५ दिवस क्वारंटाइन करण्यात आले. या दरम्यान १० दिवस तो केवळ बिस्किटांवर होता. त्याला कुठलेही अन्न देण्यात आले नाही. विद्यार्थी हिमांशूला भेटण्याचा प्रयत्न करायचे; मात्र व्यवस्थापनात नोकरी करणारे कर्मचारी त्याला भेटू देत नसत. जगभरात कोरोनाची साथ सुरू असल्याने अनेक प्रोफेसर सुटीवर आहेत. त्यामुळे तेथील व्यवस्थापनात काम करणाऱ्यांनी हिमांशूकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. हिमांशूला महिनाभर जेवणच मिळाले नाही.

मृतदेह आणण्यासाठी त्रास

हिमांशूचा मृतदेह आणण्यासाठी नुक्ते परिवाराला मानसिक त्रास सहन करावा लागला. मृतदेह पाठवण्यास त्या संस्थेच्या व्यवस्थापनाने नकारच दिला हाेता. त्यानंतर राजकीय दबाव, भारतीय दूतावासांच्या माध्यमातून मृतदेह आणण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, भारतीय दूतावास, पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनीही प्रयत्न केले. त्यानंतर सोमवारी मालवाहू विमानातून मृतदेह भारतात आणला.

बातम्या आणखी आहेत...