आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिनसमाळ लगतच्या वन हद्दीत असलेल्या सातपुडा डोंगर रांगेत लिमगव्हाण परिसरातील डोंगराला रविवारी सकाळी लागलेली अाग तिसऱ्या दिवशीही धुमसत हाेती. सलग दुसऱ्या वर्षी भीषण आग लागली. अशा पद्धतीने वनसंपदेचा नाश करणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी बुधवारी उशीरा जंगलातील ही अाग विझवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश मिळाले.
सुदैवाने वन्यप्राणी सुरक्षित असल्याचे सांगण्यात अाले. अागीने राैद्र रूप धारण केल्याने धुराचे प्रचंड लाेट दिसत असल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन पाहिले असता डाेंगरावरील दीड हेक्टर क्षेत्र जळून खाक झाल्याचे चित्र दिसले. त्यात लहान-मोठ्या वृक्षांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
गुन्हेगारांचा शाेध सुरू
या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध वन्य संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीने गुन्हेगाराचा शोध सुरू आहे. तसेच यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जनजागृती हाेत आहे. -सी.ए. काटे, वनक्षेत्रपाल, धडगाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.