आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर वीज पडून मृत्युमुखी:शेतमजूर तरुणाचा वीज कोसळून जागीच मृत्यू

रनाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे येथील तरुण शेतमजुराचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.शेरसिंग चंदू भील (वय २४) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. ढंढाणे शिवारातील शेतकरी बाबा आव्हाड यांच्या शेतात गुरुवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेरसिंग हा आपल्या पत्नीसह कामाला गेला होता.

शेतातून काम करून घरी परत येत असताना ढंढाणे शिवारातील पांझर तलावाजवळ जोरात विजा कडाडू लागल्या. यात शेरसिंग भील याच्या अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडला. तर काही अंतरावरच त्याची पत्नी संगीताबाई भील व नाना पांडुरंग ओगले हे पायी चालत होते.

अचानक वीज कोसळल्याने अन्य मजूरही भेदरले. तर वीज कोसळून पतीचा जागीच मृत्यू झाल्याने पत्नीने आक्रोश केला. या घटनेची माहिती गावातील रणजित सोनवणे, बन्सीलाल सोनवणे, मिलिंद शिंदे, भैय्या ओगले यांनी धाव घेऊन शेरसिंग याला जिल्हा रुग्णालय दाखल केले असता डॉ. प्रवीण सांगवीकर यांनी तपासून मृत घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...