आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:कंजरभाट समाजाचा युवक जगातील तिसऱ्या‎ क्रमांकाच्या प्रवासी जहाजावर थर्ड ऑफिसर‎

रणजित राजपूत | नंदुरबार‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंजरभाट समाजातील तरुण जगाच्या‎ तिसऱ्या क्रमांकाच्या "अल्यूर ऑफ द‎ सिस’ या जहाजात थर्ड आॅफिसर म्हणून‎ सेवारत असून कंजर भाट समाजात त्याचे‎ सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्याकडे‎ समाजाचा आदर्श युवक म्हणून पाहिले‎ जात आहे.‎ मयूर प्रकाश मच्छले हा तरुण‎ कंजरवाड्यात मोठा झाला. वडील कोर्टात‎ क्लर्क म्हणून नोकरीला होते. आपण वेगळे‎ काही तरी करावे, या ध्येयाने नंदुरबारला‎ बारावीचे शिक्षण घेत पुढे त्याने पुण्यातील‎ बीएस्सी नोटिकल सायन्स या शाखेत‎ प्रवेश मिळवला. त्यानंतर विविध परीक्षा तो‎ देत राहिला. नोटिकल सायन्सच्या‎ प्रमाणपत्रांवर मयूरला खनिज तेल वाहतूक‎ करणाऱ्या जहाजात नोकरी मिळाली. या‎ नोकरीमुळे नोकरीचा अनुभव मिळाला.

ही‎ नोकरी २०१६ ते ऑकटोबर २०२० मध्ये‎ राहिली. त्यानंतर कोरोनामुळे नोकरी गेली .‎ दरम्यान, दोंडाईचा येथील मॅकेनिकल‎ इंजिनिअर म्हणून अभ्यास सुरू केला.‎‎‎‎‎‎‎‎ अशातच वेगवेगळ्या शिपिंग कंपनीत अर्ज‎ केले आणि शेवटी एका बड्या‎ कंपनीकडून त्याला इंटरव्ह्यूचा कॉल‎ आला. तिथे त्याला नोकरीसाठी संधी‎ मिळाली. मार्च २०२२ मध्ये त्याने‎ नोकरीनिमित्त जहाजाची धुरा सांभाळली.‎‎‎‎‎‎‎‎ जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात‎ मोठ्या खासगी प्रवासी जहाजात तो‎ नोकरीला लागला आहे. आधी डेककॅडेट‎ पदावर नोकरी मिळाली. आता पदोन्नती‎ मिळून तो थर्ड ऑफिसर या पदावर‎ कार्यरत आहे.‎

आत्मविश्वास, इच्छाशक्तीने यश‎
इच्छाशक्ती , वडिलांचे मार्गदर्शन तसेच माझा आत्मविश्वास या‎सर्व गोष्टी मला कामात आल्या. नोकरी‎गेल्यानंतर मी हार मानली नाही. विविध ठिकाणी‎अर्ज फाटे करीत गेलो. अनेक ठिकाणी दगडे‎मारा. कुठे ना कुठे निशाणा लागतोच. एका‎ठिकाणी प्रयत्न केला असता तर मला नोकरी‎मिळाली नसती. तरुणांनी अनेक ठिकाणी‎ नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच घर, कुटुंब, गाव‎ सोडण्याची इच्छा बाळगली पाहिजे. तरच चांगल्या पगाराची‎ नोकरी मिळते, हे माझ्या अनुभवातून सिद्ध केले.-‎ मयूर प्रकाश मच्छले, नंदुरबार‎

बातम्या आणखी आहेत...