आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:उद्घाटनाला अनुपस्थित; कोनशिलेतून नावे काढणार

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सतरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन साेहळयास जाणून बुजून न आलेल्या मंत्र्यांची नावे कोनशिलेवरून काढण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतला आहे.२९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १७ कोटी खर्चाच्या पालिका इमारतीचे उद‌्घाटन पार पडले. या सोहळ्याला उपस्थिती देऊ नका, असा सल्ला भाजपच्या काही नेत्यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिल्याने भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली.

मंत्री गिरीश महाजन तर नंदुरबारला आदल्या दिवशीच दाखल झाले; परंतु या उद‌्घाटन सोेहळ्याला पाय ठेवू नका, असा सल्ला दिल्याने महाजन माघारी फिरले. त्यामुळे संतप्त व नाराज झालेल्या चंद्रकांत रघुवंशी यांनी उपमुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस वगळता अनुपस्थित सर्वच मंत्री, नेत्यांचे नाव कोनशिलेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, भाजपचे आमदार राजेश पाडवी, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी हे उपस्थित होते. मात्र भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने त्यांची नावे वगळून नवीन कोनशिला बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यांची नावे काढणार
महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री जयकुमार रावल, पदवीधर संघाचे आमदार सुधीर तांबे, आमदार आमशा पाडवी, आमदार किशोर दराडे यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...