आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळोदा:अमृत सरोवरातून गाळ काढण्याचे काम गतीने

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाळ उपसा करून पाण्याची पातळी वाढावी यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत लाखापूर फॉरेस्ट येथील अमृत सरोवरातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे सरोवराची पातळी व क्षमता वाढणार आहे.

परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षांपासून या सरोवरातील गाळ काढलेला नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात गाळ साठल्यामुळे सरोवराची खोली व साठवण क्षमताही कमी झाली आहे. या प्रसंगी गटविकास अधिकारी पी.पी. कोकणी, पं.स. सदस्य चंदन पवार, विस्तार अधिकारी बी.डी. मोहिते, बी.के. पाटील, ग्रामसेवक महेश पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हितेश गिरासे, तांत्रिक सहाय्यक तुषार वानखेडे, रोजगार सेवक व मजूर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...