आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारमध्ये घोड्याच्या शर्यतीत अपघात:काठी दसरानिमित्त आयोजित घोडे शर्यतीमधील घटना; जीवितहानी नाही

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथे दसरा निमित्त आयोजित घोड्याच्या शर्यतीत अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.

अतिदुर्गम भागात वसलेले काठी येथे जवळपास 800 वर्षांची परंपरा असलेला दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोना प्रतिबंधामुळे ही घोडदौड आयोजित करण्यात आली नव्हती.

दोन वर्षानंतर होत असलेली ही पारंपारिक घोडदौड बघण्यासाठी दर्याखोऱ्यातून ग्रामस्थ हे आले होते. घोड्याच्या शर्यती सुरू असताना रस्त्यावर उभे असलेले काही प्रेक्षकांना मागून येणारे घोडसवारानी जोरदार धडक दिल्याने तीन ते चार प्रेक्षक व घोडसवार हे जखमी झाले आहेत. शर्यतीदरम्यान रस्त्यावर आलेल्या काही तरुणांना वेगात धावणाऱ्या घोड्याने धडक दिली. यामध्ये एक तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव विधीवत पुजेसह संपन्न झाला. या ठिकाणी होणारी घोड्यांची शर्यत आणि रावणपूजन खऱ्या अर्थाने आकर्षणाचा विषय असतो. करोनाच्या दोन वर्ष कालखंडानंतर यंदा घोडे शर्यतीत विशेष उत्साह दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...