आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नेहरू उद्यानाजवळील वळणावर बोलेरो वाहनाचा अपघात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास झाला. महामार्गावर भरधाव येणारी बोलेरो गाडीला ट्रकने हुलकावणी दिल्याने बोलेरो गाडी वळणावरील दुभाजकाला जोरदार आदळली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात चालक चैतन्य नेरकर (आंबखेल ता. पिंपळनेर) यांना गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तर विनोद पवार (पिंपळनेर) यांचा डोक्याला गंभीर इजा आहे. चौघांपैकी इतर दोघे प्रवासी खासगी रुग्णालयात गेले.
दोघे जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून धुळे येथे दाखल केले. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे कर्मचाऱ्यांची गाडी होती. हॉटेलहून जेवण करून घरी रंगेश्वर पार्क येथे जात असताना नेहरू उद्यानाच्या तीव्र वळणावर गाडी अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला. अपघातात गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे. धडक एवढी जोरदार होती की गाडीमधील एअर बॅग बाहेर निघून फुटून गेली. त्यामुळे चालकाला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे, रणजित राजपूत, माजी शहर प्रमुख गोविंद मोरे, दर्शन पाटील, सलीम मन्सुरी, अजय सेन, भूषण सांगळे, प्रकाश यादव यांनी जखमींना मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.